खोडशिवनी गावाची माहिती: गावाचे नाव: खोडशिवनी तालुका: सडक अर्जुनी जिल्हा: गोंदिया राज्य: महाराष्ट्र पिनकोड: 441801 भौगोलिक स्थान: अक्षांश: 21.348789 रेखांश: 80.212233 वाहतूक सुविधा: रेल्वे स्थानक: खोडशिवनी येथे स्वतःचे रेल्वे स्थानक आहे (स्टेशन कोड: KSIH). हे स्थानक एका सिंगल इलेक्ट्रिक लाईनवर असून येथे एकच प्लॅटफॉर्म आहे.
गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत नक्षलग्रस्त क्षेत्रात असलेल्या सडक/अर्जुनी पं.समिती क्षेत्रात पश्चिम दिशेला निसर्गरम्य वातावरणात बसलेले गाव खोडशिवनी. गावाचे एकुण क्षेत्रफळ ५१२.७४ हे आर. आहे. गावात एकुण ०३ वार्ड आहेत. गावाची एकुण लोकसंख्या २७६७ आहे. खोडशिवनी हे गोंदिया – कोहमारा या राज्यमार्गावर खजरी वरुन पश्चिमेला ४ कि.मी. अंतरावर आहे. ग्रा.पं. खोडशिवनी ची स्थापना सन- १९५१ ला झालेली आहे. ग्रामपंचयात ची मागील निवडनुक २०२२ ला झालेली असुन सद्या ग्रामपंचायत खोडशिवनी चे सरपंच श्री. गंगाधर बाबुराव परशुरामकर , उपसरपंच श्री. सत्यवान यादोराव नेवारे, ग्रामसेवक श्री. ओ.एन. कापगते हे आहेत. ग्रामपंचायतला आता पर्यंत सन- २००७-८ ला निर्मलग्राम पुरस्कार, सन- २००८-०९ ला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तालुकास्तर प्रथम, जिल्हास्तर द्वितीय पारितोषिक मिळालेले आहे.
गावात १ जिल्हा परिषद शाळा, ३ खासगी शाळा आहेत. अंगणवाडी केंद्र ३ असुन त्यामध्ये १००% शौचालयाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. गावामध्ये whatsapp ग्रुप द्वारे ग्रा.पं. संबंधाने सर्व माहिती ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यात येते. ग्रामपंचायत,जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी येथे R.O व वाटर कुलर आहे. तसेच गावातील सर्व नागरीकांन करीता सार्वजनिक R.O व वाटर कुलर बसविण्यात आला आहे. गावातील सर्व शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, वाजनालय तसेच सार्वजनिक ठिकाणे CCTV कँमेराच्या निगरानिमध्ये आहेत. शाळेतील मुलांसाठी खेळण्यासाठी सूशोभीत क्रीडांगण, वृक्षारोपण तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभाची कामे (सि.विहीर, गुरांचे गोठे,शेळी शेड,नाडेप खड्डे) ई.कामे ग्रा.पं.मार्फत करण्यात आलेली आहेत. म.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये ३१३३२ मनुष्य दिवस निर्माण झालेली आहेत. गाव ODF+ झालेले आहे.
ग्रामपंचायत ने विविध उपक्रम हाती घेतले असुन गावामध्ये मुलींचा जन्म दर वाढी करीता मुलगी जन्मलेल्या कुटुंबाला १ हजार रुपये प्रोत्साहन राशी वाटप करण्यात येते. गावात मैयत झाल्यास बांबु तोड होवु नये म्हणुन ग्रा.पं. मार्फत २ तिरड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गावा मध्ये प्रत्येक कुंटुबाला १ उच्च जातीचे कलम केलेले आंब्याचे झाड वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षात रमाई आवास, सबरी आवास, मोदी आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आवास योजनांच्या माध्यमातुन ११५ घरकुल बांधकाम करण्यात आले आहेत. गावातील महीलांना सामाजीक क्षेञातील आत्मविश्वास वाढविण्याकरीता विवध कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यात सुञसंचालनाची तसेच कार्यक्रमाची संपुर्ण जबाबदारी दिली जाते. ग्रा.पं.ने राखुन ठेवलेल्या नर्सरी मधील मोह, पळस, चार, बांबु पासुन ग्रा.पं.ला उत्पन्न होते. गावातील युवकांना स्वतःचे व्यवसाय गावातच करता यावे म्हणुन गावात २१ दुकान गाडे आहेत. गावात आठवडी बाजार असुन त्यात बाजार ओट्यांची व्यवस्था आहे. गावामध्ये संपुर्ण दारु बंदी करण्यात आलेली आहे. गावात ५० टक्के पेक्षा कमी मायक्रान च्या प्लाँस्टिक वर बंदी आहे. सिंचना करीता गावाजवळुन वाहत जाणा-या चुलबंद नदिवर लोक वर्गणिमधुन लिफ्ट एरेगेशन करुन तलावात पाणी आणले जाते.